Home / News / राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

राज ठाकरेंनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मनसेच्या पदाधिकार्‍यांची आज मुंबईत...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. मनसेच्या पदाधिकार्‍यांची आज मुंबईत बैठक बोलावली असतानाच राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्‍यांच्या भेटीला पोहाचले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास विकासकामांबाबत चर्चा झाली, असे सांगण्यात आले. गेल्या दोन महिन्यांमधली राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी भेट आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या