मुंबई – आपल्या रोखठोक भाषणामुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एक व्यंगचित्रकारही आहेत. जागतिक व्यंगचित्र दिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव 2023 चे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपस्थितांच्या आग्रहाखातर राज्यात सध्या सुरू असलेल्या घडामोडी डोळ्यासमोर ठेवत विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले. राज ठाकरे यांना आयोजकांनी सध्याच्या राजकीय घडामोडीवर व्यंगचित्र काढायला सांगितले होते. त्यानंतर अवघ्या 3 मिनिटांत त्यांनी अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले. सध्या राज्यात जे सुरू आहे त्यावर भाष्य करणारे अजित पवार यांचे व्यंगचित्र काढतो, असे म्हणत त्यांनी हातात पेन्सिल धरली आणि कोर्या कॅनव्हासवर अजित पवार यांचे व्यंगचित्र काढले. ते पूर्ण होताच, ‘आता पुढे काय लिहू, आता गप्प बसा’, अशी मिश्किल टिपणीही केली. यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. राजकीय व्यंगचित्र काढण्यासाठी वेळ लागतो. खूप दिवसांनी कुंचला हाती धरला आहे. बाळासाहेबांप्रमाणे बैठक मारून चित्र काढण्याची सवय आहे. आता जे झाले ते गोड माना. मला असे व्यंगचित्र काढायची सवय नसल्याचेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरे यांनी तीन मिनिटांत अजित पवार यांचे व्यंगचित्र रेखाटले
