राम सेतूच्या याचिकेवर सुनावणी
घेण्यास सुप्रीम कोर्ट सकारात्मक

नवी दिल्ली : तामिळनाडू आणि श्रीलंकेला जोडणाऱ्या राम सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याच्या याचिकेवर सुनावणी घेण्याची सुप्रीम कोर्टाने तयारी दाखवली आहे. माजी खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी याबाबतची याचिका दाखल केली होती.
स्वामी यांनी राम सेतूला राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा देण्याबाबतचे केंद्र सरकारला निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती जे. बी. पर्डीवाला यांच्या खंडपीठाने सोमवारी सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेची दखल घेतली. गेल्या नऊ वर्षांमध्ये सरकारने या मागणीवर काहीच कार्यवाही केली नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तीन महिन्यांपूर्वी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरसिंहा आणि जे.बी. पार्डीवाला यांच्या पीठाने सांगितले की, आम्ही त्यावर लवकरच सुनावणी करू. यापूर्वी १९ जानेवारी रोजी सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात म्हटले होते की, सांस्कृतिक मंत्रालय राम सेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करण्याच्या प्रक्रियेवर काम सुरु आहे.

Scroll to Top