मुरुड-जंजिरा – मुरूड तालुक्यातील शहराला लागून असलेल्या एकदरा गावात पाण्यासाठी महिलांना आजही हंडा डोईवर घेऊन वणवण भटकावे लागते आहे.विशेष म्हणजे राष्ट्रपती पदक पटकावणारे मुरुड तालुक्यातील एकदरा हे पहिले गाव आहे. हे गाव गेल्या काही वर्षांपासून पाण्यासाठी तळमळत आहे.
या गावाला दरवर्षी भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
या गावाची लोकसंख्या २८०० इतकी असून या गावाला मुरुड खारआंबोली धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र इथली पाईपलाईन जीर्ण झाल्याने तिला गळती लागली आहे. ही गळती थांबविण्यासाठी जिल्हा प्रशासन टाळाटाळ करत असल्याने नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहिले आहेत.