राहुल गांधींच्या राजकारणात बदल! स्‍मृती इराणी यांचे वक्तव्य

नवी दिल्ली- राहुल गांधींच्या राजकारणात बदल झाला आहे असे वक्तव्य भाजपा नेत्या स्‍मृती इराणी यांनी केले आहे. गेली दहा वर्षांपेक्षा अधिक काळ राहुल गांधी आणि गांधी कुटुंबीयांवर घणाघाती टीका करुन नेहमीच चर्चेत राहिलेल्‍या स्‍मृती इराणी यांचा लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांच्‍याकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोनच बदलला आहे. त्‍यांनी चक्‍क राहुल गांधी यांच्‍या राजकीय वाटचालीचे कौतूक केले आहे.

स्‍मृती इराणी म्‍हणाल्‍या की, राहुल गांधी यांच्‍या स्वभावात आणि राजकारण करण्याच्या पद्धतीत मोठा बदल झाला आहे. त्यामुळे त्यांना यश मिळाले आहे. जातीच्या राजकारणातही राहुल गांधी हे अत्यंत जपून बोलत आहेत. संसदेत पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट घालून येतात. त्यातून ते युवकांना काय संदेश देत आहेत, हे त्यांना चांगले माहिती आहे. अनेक बाबतीत ते विचारपूर्वक पावले टाकत आहेत. राहुल गांधी वेगळ्या प्रकारचे राजकारण करत आहेत. तुम्हाला ते बरोबर किंवा चुकीचे वाटत असेल. पण ते वेगळे राजकारण करत आहेत. चर्चेत राहण्यासाठी ते वादग्रस्त विधाने करत आहेत. मिस इंडिया स्पर्धेत दलित किंवा आदिवासी स्पर्धक नसल्याबाबतचे त्यांचे विधानही असेच आहे.