राहुल गांधी आज महाराष्ट्र दौऱ्यावर

बुलढाणा- लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी उद्या महाराष्ट्र दौ-यावर येणार आहेत. त्यांची उद्या दुपारी १२ वाजता बुलढाणा मधील चिखलीचे काँग्रेस उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगावचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे. दुपारी ३.३० वाजता गोंदिया विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गोपाल अग्रवाल यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहेत.