राहुल गांधी देशाच्या एकात्मतेसाठी खतरा! मंत्री रिजिजू यांचे ट्विट करत हल्लाबोल

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. केंब्रिज विद्यापीठातील राहुल यांच्या वक्तव्यावर ट्विट करत किरण रिजिजू यांनी राहुल गांधींना देशाच्या एकात्मतेसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. अगदी ‘पप्पू’ म्हणून हि त्यांचा उल्लेख केला आहे. किरणने रिजिजू यांनी लंडनमधील एका काँग्रेस समर्थकाने दिलेल्या सल्ल्याचा व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये ते इंदिरा गांधींचे उदाहरण देत राहुल यांना समजावून सांगतात की, जगातील इतर कोणत्याही देशात भारताविरोधात बोलणे अयोग्य आहे.

केंब्रिज विद्यापीठात केलेल्या वक्तव्यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी हे भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल गांधी हे देशासाठी धोकादायक आहेत, पण हे परदेशातील नागरिकांना माहित नाही, असे म्हणत राहुल गांधींवर टीका केली आहे. या संदर्भात केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी ट्विट करत जोरदार हल्लबोल केला आहे.

केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतातील लोकांना राहुल गांधी पप्पू आहेत हे माहित आहे. पण परदेशातील लोकांना ते पप्पू आहेत हे माहित नाही. त्यांनि केलेल्या मूर्ख विधनावर प्रतिक्रिया देणे मला आवश्यक वाटत नाही. परंतु त्यांच्या भारतविरोधी केलेल्या अशा विधानाचा भारतविरोधी शक्ती प्रतिमा खराब करण्यासाठी गैरवापर करत आहेत. त्यांउळे राहुल गांधी हे देशाच्या एकात्मतेसाठी सर्वात मोठा धोका आहे. असे रिजिजू यांनी ट्विट केले आहे. मंत्री रिजिजू यांनी लंडनमधील एका काँग्रेस समर्थकाने राहुल यांना दिलेल्या सल्ल्याचा व्हिडियो देखील शेअर केला आहे.

ज्यामध्ये ते इंदिरा गांधी यांचे उदाहरण देत राहुल यांना समजावून सांगतात की, जगातील इतर कोणत्याही देशात भारताविरोधात बोलणे अयोग्य आहे. मला खात्री आहे की, तुम्ही तुमच्या आजीने इथे जे सांगितले त्यातून काहीतरी शिकाल. मी तुमचा शुभचिंतक आहे आणि मला तुम्हाला पंतप्रधान म्हणून बघायचे आहे असे त्यांच्या समर्थकाने म्हटले आहे. यावर राहुल यांनी फक्त हसत प्रतिक्रिया दिली आहे.

Scroll to Top