रिमझिम पावसातही कास परिसर पर्यटकांनी गजबजला

कराड- सातारा जिल्ह्यात अधूनमधून रिमझिम पाऊस बरसत आहे.अशा वातावरणातही कास पठार आणि कास तलाव परिसराकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. या महिन्यातील सलग तीन दिवसांच्या सुट्टीत तर हा परिसर पर्यटकांनी गजबजलेला दिसत होता.

सध्या तुरळक पाऊस आणि दाट धुके यामुळे कास परिसरातील वातावरण आल्हाददायक बनले आहे. त्यामुळे उत्तेश्वर घाटापासून बामणोली कास तलावापर्यंत पर्यटकांच्या वाहने दिसत आहेत.शनिवार,रविवार आणि सोमवार ईद अशा सलग तीन सुट्या जोडून आल्याने कासचे पावसाळी पर्यटन बहरले होते.कोयनेचा शिवसागर तलाव आटला असला तरी पर्यटक या निसर्ग सौंदर्याचा मनमुरादपणे आनंद लुटत होते.तसेच पर्यटक मंडळी
कास पठारावरील विविध प्रकारच्या झाडांचे अवलोकन करताना दिसत होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top