नवी दिल्ली- मनी लाँड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले आपचे नेते आणि माजी मंत्री सत्येंद्र जैन यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल एलएनजेपी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. जैन यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि डॉक्टरांशीही चर्चा केली.
तिहार तुरुंगात जेरबंद असलेले सत्येंद्र जैन गुरुवारी बाथरूममध्ये पडले आणि तेथेच बेशुद्ध पडले. यादरम्यान त्यांच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली. त्यामुळे त्यांना रक्तत्राव झाला. मात्र,आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात उपचार सुरू असताना केजरीवाल एलएनजेपी रुग्णालयात पोहोचले आणि जैन यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
रुग्णालयात केजरीवालांनी घेतली सत्येंद्र जैन यांची भेट
