नवी दिल्ली :- रेमडेसिवीर ह्या इंजेक्शनचा कोरोना महामारीच्या काळात मोठया प्रमाणात वापरण्यात आले. त्याचवेळी २०२० मध्ये या इंजेक्शनचा कोरोना उपचारात वापरावर बंदी घालण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. माध्यमांमध्ये या इंजेक्शनचा प्रचार करून लोकांची फसवणूक केली जात असल्याचे याचिकेत म्हटले होते. मात्र, ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.
रेमडेसिवीर आणि फेविपिराविर हे दोन इंजेक्शन कोविड-19 रूग्णांच्या उपचारांसाठी नियामक प्राधिकरणांच्या परवानगीशिवाय प्रचार केला जात असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला होता. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी एका खंडपीठाने ऑक्टोबर २०२० मध्ये केंद्राला या प्रकरणी नोटीस बजावली होती. २०२१ मध्ये वलिक एमएल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारकडून उत्तर मागितले होते. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालाचा हवाला देत याचिकाकर्त्याने दावा केला होता की रेमडेसिवीर अनेक चाचण्या घेण्यात आल्या होत्या ज्यात कोविड-१९ च्या उपचारात हे इंजेक्शन कोणताही परिणाम होत नाही. मात्र, याचिका फेटाळून लावताना, मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती पीएस नरशिमा आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला यांच्या खंडपीठाने सांगितले की, या मुद्द्यांवर न्यायालय तपास शकत नाही.