रेयाना बरनावी या सौदी अरेबियाच्या
पहिल्या महिला अंतराळवीर ठरणार

रियाध – सौदी अरेबियातील पहिली महिल अंतराळात झेप घेणार आहे. रेयाना बरनावी असे त्यांचे नाव आहे. ९ मे रोजी रेयाना इंटरनॅशनल स्पेस स्टेशनसाठी रवाना होणार आहेत. रेयाना या पेशाने ब्रेस्ट कॅन्सर संशोधक आहेत. त्यांच्या या अंतराळयात्रेमुळे नवा इतिहास रचला जाणार असून त्या सौदी अरेबियातून अंतराळात जाणाऱ्या पहिल्या महिला ठरणार आहेत.

रेयाना यांच्यासोबत आणखी दोन अंतराळवीर उड्डाण करणार आहेत. यात नासाचे माजी अंतराळवीर पेगी व्हिटसन आणि बिजनेसमन जॉन शॉफनर यांचा समावेश आहे. याआधी एक अंतराळवीर सुल्तान अल नेयादी याला अंतराळात पाठवण्यात आले आहे. ९ मे रोजी निघणारे अंतराळवीर तिथे पोहचून अल नेयादी यांना भेटणार आहेत. या ऑपरेशनची जबाबदारी स्पेस-एक्स कॅप्सूलवर असणार आहे. रेयाना या पेशाने ब्रेस्ट कॅन्सर संशोधक असल्या तरीही त्यांनी \’स्पेस अँड टेक्नॉलॉजी\’ या क्षेत्राचे शिक्षण घेतले आहे. त्या पहिल्या महिला आहेत, ज्यांनी हे खास शिक्षण घेतले आहे. याव्यतिरिक्त त्यांनी न्यूझीलंडच्या ओटॅगो विद्यापीठातून जेनेटिक इंजिनिअरिंग आणि टिश्यू डेव्हलपमेंटमध्ये पदवी घेतली आहे.

Scroll to Top