लखनौ – लखनौमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, पुढचे दोन दिवस पाऊस सुरू राहाण्याची शक्यताही हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यानंतर आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आदेशामुळे सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्याचवेळी अनेक रेल्वेगाड्यादेखील रद्द करण्यात आल्या.
सप्टेंबर महिन्यात उत्तर भारतात इथे चांगला पाऊस पडतो. त्यामुळे हवामान खात्याने उत्तर प्रदेशातील सुमारे दहा जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला होता. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौसह राज्याच्या अनेक भागांत दिवस पाऊस पडला. शाहजहांपूरमध्ये रविवारी रात्रभर पाऊस सुरूच होता. १२ तासांत ५१ मिमी पावसाची नोंद झाली. तर रविवारी रात्री आणि सोमवारी पहाटेपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसाने लखनौच्या अनेक भागात पाणी साचले होते. रात्रभर वीज खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.
सोमवारी सकाळी जिल्हा दंडाधिकारी सूर्यपाल गंगवार यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले. कोणत्याही आवश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, असा इशाराही डीएम कार्यालयाकडून शहरवासीयांना देण्यात आला. विजांच्या कडकडाटासह आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. झाडे किंवा कमकुवत इमारतींखाली उभे राहणे टाळा, असा इशारा देण्यात आला. सावधगिरी म्हणून अनेक ट्रेनही रद्द करण्यात आल्या.