रायपूर- भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी याच्या चाहत्याने स्वतःच्या लग्नपत्रिकेवर त्याचा फोटो छापला आहे. दीपक पटेल असे या चाहत्याचे नाव आहे. तो छत्तीसगडच्या मिपारा येथील कोंडकेल जिल्हातील रहिवासी आहे. लग्नपत्रिकेवर धोनीच्या फोटोसह त्याचा जर्सी क्रमांक ७ आणि त्याचे नावही छापण्यात आले आहे.
धोनीचा फोटो असलेली ही लग्नपत्रिका सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. दीपक पटेल याने धोनीला आपल्या लग्नाचे आमंत्रणही दिले आहे. दीपक लहानपणापासूनच धोनीचा मोठा चाहता आहे. तो धोनीला आपला आदर्श मानतो. त्याच्या लग्नपत्रिकेची सर्वत्र चर्चा होत आहे.