लग्नाचे नाही तर घटस्फोटाचे सेलिब्रेशन करत फोटोशूट

चेन्नई – लग्नानंतर पतीपासून विभक्त होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी अतिसंवेदनशील गोष्ट असते. घटस्फोटानंतर जबाबदार ‘ती’च असते असा समज असणारा एक समाज आपल्याकडे आहे. तमिळ अभिनेत्री शालिनी हिने अशा जुन्या विचारसरणीला मोडीत काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.’ माझ्या आयुष्यात 99 समस्या आल्या पण एक नवरा आला नाही, असा संदेश देत तिने तिच्या घटस्फोटाचे आनंदाने फोटोशूट केले आहे. हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
शालिनीने रियाझ नावाच्या व्यक्तीशी विवाह केला होता. मात्र नवर्‍याकडून मानसिक आणि शारीरिक छळ होत असल्याचा आरोप तिने केला होता. यामुळे त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता. घटस्फोटानंतर शालिनीने फोटो शूट करत आनंद व्यक्त केला आहे. एका फोटोत हातात ‘डिव्होर्स’ असा बोर्ड घेऊन ती उभी आहे, ज्यावर लिहिले आहे, ‘माझ्या आयुष्यात 99 समस्या आल्या पण एक नवरा आला नाही’ असे लिहिले आहे. पतीपासून विभक्त झाल्यानंतर त्याचे दु:ख करत बसण्यापेक्षा या गोष्टीकडे सकारात्मक दृष्टीने पाहून हटके अंदाजात तिने घटस्फोटाचे फोटोशूट केले आहे. तिच्या इन्स्टाग्रामवरून हे फोटो शेअर करत शालिनीने म्हटले आहे की, ‘घटस्फोटित महिलेचा संदेश त्या लोकांसाठी ज्यांना चांगले विचार पटत नाहीत, ज्या लग्नाचा तुम्हाला त्रास होतो त्या लग्नातून मुक्त होणे गरजेचे आहे. कारण तुम्ही आनंदी राहण्याचा तुम्हाला हक्क आहे आणि कधीही तडजोड करू नका, तुमच्या जीवनावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःचे आणि तुमच्या मुलांचे चांगले भविष्य घडवण्यासाठी आवश्यक बदल करा.’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top