लव्ह जिहादची सत्य कथा ‘द केरळ स्टोरी’चा ट्रेलर लाँच

नवी दिल्ली – ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी रिलीज झाला आहे. केरळ राज्यातील 32,000 तरुण मुली लव्ह जिहादला बळी पडून दहशतवादी संघटना आयसिसमध्ये सामील झाल्याच्या धक्कादायक कहाणीवर हा चित्रपट आधारित आहे. हा चित्रपट 5 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदिप्तो सेन यांनी केले आहे. विपुल अमृतलाल शाह या चित्रपटाचे निर्माते आहेत. नोव्हेंबर 2022 मध्ये या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. तमिळनाडूतील एका पत्रकाराने चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केंद्रीय चित्रपट सेन्सॉर बोर्ड, केरळचे मुख्यमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top