नवी दिल्ली –
तीन दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यातील मछना गावाजवळ भारतीय लष्कराचे ध्रुव हेलिकॉप्टर कोसळण्याची घटना घडली होती. त्यानंतर आता भारतीय संरक्षण विभागाने लष्कराच्या ताफ्यातील सर्व एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर वापरण्यास बंदी घातली आहे.
लष्कराच्या उत्तर विभागाने म्हटले आहे की, लष्कराच्या विमान विभागातील ध्रुव हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे किश्तवाड येथील मारूआ नदीच्या किनार्यावर उतरावे लागले होते.भारताकडे ७० ध्रुव हेलिकॉप्टर आहेत. त्याचा वापर भारतीय तटरक्षक दलासह लष्कर नौदल आणि हवाई दल करते. या हेलिकॉप्टरमध्ये ‘टीएम ३३ २ बी २’ इंजिन आहेत. अपघातग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये एक इंजिन बंद पडले होते. अनेकदा या इंजिने हलका पेट घेत असल्याचेही दिसून आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून लष्कराने या ध्रुव हेलिकॉप्टर वापरास बंदी घातली आहे.