Home / News / लांजा तालुक्यात आढळले अमेरिकन दुर्मिळ फुलपाखरू

लांजा तालुक्यात आढळले अमेरिकन दुर्मिळ फुलपाखरू

रत्नागिरी- लांजा तालुक्यातील खानवली बेनी येथे दुर्मिळ असे पोपटी रंगाचे परीसारखे दिसणारे फुलपाखरू आढळले आहे. हे फुलपाखरू अमेरिकेच्या उत्तर भागात...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

रत्नागिरी- लांजा तालुक्यातील खानवली बेनी येथे दुर्मिळ असे पोपटी रंगाचे परीसारखे दिसणारे फुलपाखरू आढळले आहे. हे फुलपाखरू अमेरिकेच्या उत्तर भागात आढळते.

लांजा येथील सामाजिक कार्यकर्ते वैभव वारीसे यांनी या फुलपाखराचे चित्र आपल्या मोबाईलमध्ये टिपले आहे.यापूर्वी राजापूर तालुक्यातील हातिवले कॉलेजच्या प्राध्यापकांना अँक्टीनासल्युना हे फुलपाखरू आढळून आले होते.खानवली बेनी येथे आढळलेल्या या फुलपाखराच्या पंखाची रचना परीसारखी आहे. पंखांचा रंग फिकट पोपटी असून हे फुलपाखरू भारतात क्वचितच आढळते.याच्या पंखावर चंद्रासारखे गोलकार ठिपके आहेत.ते चंद्रगोलाकार कलेकलेनी वाढत जावून त्याचा पूर्ण चंद्र होतो. यापूर्वी आसाममध्ये २०१० सालात सोनेरी जंगलात या जातीचे फुलपाखरू आढळून आले होते. राजापूर,लांजा तालुक्यात गेल्या काही वर्षापासून दुर्मिळ फुलपाखरू आढळून येत आहेत. यात माऊल मॉथ, मनू मॉथ, सिल्क मॉथ आणि ऍटलास या प्रजाती आढळून आल्या होत्या. आता यामध्ये अमेरिकन दुर्मिळ फुलपाखराची भर पडली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या