लाडकी बहीणचा पहिला हफ्ता १७ ऑगस्टला

मुंबई – राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेचा पहिला हफ्ता १७ ऑगस्टला महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. यासाठी एक भव्य कार्यक्रम घेण्याचा निर्णय महायुती सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उपस्थित राहणार आहेत. १७ ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांच्या बँक खात्यात पहिला हफ्ता जमा केला जाणार आहे. राज्यातील पिवळे आणि केशरी रेशनकार्ड असलेल्या २१ ते ६० वर्षांमधील महिलांना दरमहा १५०० रुपये प्रमाणे वर्षाला १८ हजार रुपये दिले जाणार आहेत, अशी माहिती शासनाकडून देण्यात आली. या योजनेत पात्र महिलांना महिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत.