लातूर: लातूर जिल्ह्यातील लातूर शहर,औसा, निलंगा, वलांडी परिसरात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी टोमॅटो आता बांधावर फेकून दिले. औसा तालुक्यातील किल्लारी आणि आजूबाजूचा परिसर तसाच रेणापूर तालुक्यातील पानगाव आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागेचे क्षेत्र आहे. तसेच जिल्ह्याभरात मोठ्या प्रमाणामध्ये केसर आंब्याची बागही आहे. या पावसामुळे द्राक्षबाग आणि आंब्याच्या बागेचे नुकसान झाले आहे.
राज्यात अवकाळी पावसाचे थैमान सुरुच आहे. हवामान विभागाने राज्यातीप अनेक जिल्ह्यांत पुन्हा एकदा गारपिटीचा इशारा दिला. पुढील काही दिवसाच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात उन्हाळा कायम राहण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेतकरी मात्र चांगलेच हवालदिल झाले. कारण हाती आलेली पिके या पावसामुळे वाया जात असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. तात्काळ पंचनामे करण्याची मागणी या शेतकऱ्याने आता केली आहे.
लातूरमध्ये अवकाळी पावसामुळे टोमॅटो, द्राक्ष, आंब्याचे नुकसान
