मुंबई – लालबागचा राजा या मुंबईतील प्रसिद्ध व श्रीमंत गणेशोत्सव मंडळाच्या सन्माननीय सल्लागारपदी रिलायन्सचे अनंत अंबानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत त्यांच्या नियुक्तीला मंजुरी देण्यात आली.मंडळाने म्हटले आहे की अनंत अंबानी यांचा लालबागचा राजा मंडळाशी गेल्या पंधरा वर्षापासून संबंध असून त्यांना मंडळाची सन्माननीय सदस्यता देण्यात आली आहे. कोरोना काळात अंबानी कुटुंबियांनी दिलेल्या आर्थिक पाठिंब्यामुळे मंडळाला रुग्ण सहाय्य करता आले होते. रिलायन्स फाऊंडेशनने मंडळाला २४ डायलेसिस मशीन दिली आहेत. मंडळाच्या इतर कार्यामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग असतो. लालबागचा राजा सल्लागार समितीत अनेक माजी अध्यक्षांचा व राजकीय पक्षातील नेत्यांचाही समावेश असून अंबानी यांच्या योगदानामुळे मंडळाच्या कार्यात वाढ होईल असा विश्वास मंडळाने व्यक्त केला.