लालू प्रसाद यादवांना
सुप्रीम कोर्टाची नोटीस

पाटणा – बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव वडील झाल्यानंतर राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादवांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असताना लालूंना सुप्रीम कोर्टाची नोटीस आली. चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणी त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने जामिनावर असलेल्या लालूंना नोटीस पाठवून उत्तर मागितले आहे.
लालू यादवांचा धाकटा मुलगा तेजस्वी यादव याला मुलगी झाली आहे. त्यानंतर संपूर्ण लालू परिवार आनंदात बुडाला असताना लालूंना दणका मिळाला आहे. चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात सुप्रीम कोर्टाने त्यांना नोटीस पाठवली. हा जामीन रद्द करण्यासाठी सीबीआयने सुप्रीम कोर्टात दाद मागितली. आता नोटीस आल्याने लालू यादवांच्या समर्थकांना काळजी वाटू लागली आहे. कारण लालू यादव पुन्हा तुरुंगात जाणार की काय याची भीती वाटू लागली आहे.

Scroll to Top