लोअर परळ, दादर, माहीम भागात२७ व २८ मे रोजी पाणीपुरवठा बंद

मुंबई –

मुंबईतील लोअर परळ, वरळी ते माहीम या भागात २७ व २८ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारी दादर पश्चिम येथील तानसा जलवाहिनी फुटली आहे. या जलवाहिनीचे दुरुस्तीचे काम २७ मे रोजी सकाळी ८ वाजता सुरु होणार असून २८ मे रोजी सकाळी १० वाजता पूर्ण होणार आहे. या २६ तासांच्या कालावधीत दादर, माहीम, माटुंगा, डिलाईल रोड बीडीडी, सात रस्ता, धोबी घाट इत्यादी परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तरीही या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महापालिकेच्या जल विभागाने केले आहे.

दादर (पश्चिम) मधील सेनापती बापट मार्ग व काकासाहेब गाडगीळ मार्ग यांच्या जंक्शनवर असलेल्या १,४५० मिमी व्यासाच्या तानसा पूर्व व पश्चिम मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरूस्तीचे काम जलअभियंता विभाग हाती घेणार आहे. शनिवारी सकाळी ८ च्या सुमारास हे काम सुरू होणार आहे, तर रविवारी सकाळी १० वाजता पूर्ण होणार आहे. यावेळी गळती शोधण्यासाठी संपूर्ण जलवाहिनीचा पुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे याठिकाणी पाणीकपात घेऊन त्यानंतर नेमकी गळती शोधून पॅचवर्क किंवा रिबेट बदलून दुरूस्ती पूर्ण करण्यात येणार आहे. सध्या गळती शोधण्यासाठीचे प्राथमिक काम सुरू करण्यात आल्याची माहिती जलअभियंता विभागाने दिली आहे.

दरम्यान, जी उत्तर विभाग संपूर्ण माहीम पश्चिम, माटुंगा पश्चिम, दादर पश्चिम, सेनापती बापट मार्ग, वीर सावरकर मार्ग, गोखले रोड, काकासाहेब गाडगीळ मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, मोरी मार्ग, सेनाभवन परिसर, टी. एच. कटारिया मार्ग, कापड बाजार या परिसरात २७ मे रोजी सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील. तर जी दक्षिण विभाग डिलाई रोड बीडीडी, संपूर्ण प्रभादेवी परिसर, जनता वसाहत, संपूर्ण लोअर परळ विभाग, पांडुरंग बुधकर मार्ग, सेनापती बापट मार्ग, गणपतराव कदम मार्ग, ना. म. जोशी मार्ग, वीर सावरकर मार्ग, एस. एस. अमृतवार या परिसरात २७ मे रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ७ या वेळेत पाणीपुरवठा बंद राहील. तसेच ना. म. जोशी मार्ग, डिलाईल रोड बीडीडी, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग, धोबी घाट, सातरस्ता या परिसरात २८ मे रोजी पहाटे ४ ते सकाळी ८ या कालावधीत पाणीपुरवठा बंद राहिल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top