नवी दिल्ली – लोकसंख्या नियंत्रणासाठी कायदा करण्याची मागणी योगगुरू स्वामी रामदेव बाब यांनी पुन्हा एकदा केली आहे. देशाची लोकसंख्या १४० कोटी झाली आहे. देशाची सध्याची परिस्थिती पाहता लोकसंख्येचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे, त्यामुळे देशाच्या संसदेत लोकसंख्या नियंत्रणाबाबत कायदा करणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी रामदेव बाबांनी केला आहे.
रामदेव बाबांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्याची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ नाही,यापूर्वीही त्यांनी हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला आहे. यापूर्वी बाबा रामदेव म्हणाले की, ज्या प्रकारे देशाची लोकसंख्या वाढत आहे ही एक गंभीर बाब आहे. सध्याच्या लोकसंख्येबाबत चिंता व्यक्त करत, रामदेव बाबा यांनी भविष्यात खूप मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होवू शकेल अशी भीती व्यक्त केली. सध्याची परिस्थिति पहाता, लोकांना रेल्वे, विमानतळ, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये रोजगार उपलब्ध करून देऊ शकलो तर ते पुरेसे असल्याचे म्हटले आहे. मात्र याच्यापुढे देशावर अतिरिक्त भार पडू नये. यासोबतच बाबा रामदेव यांनी उत्तराखंडला पहिली वंदे भारत एक्स्प्रेस दिल्याबद्दल पीएम मोदी आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले.