वडाळ्यातील संगमनगरात आग
बेस्टचे वीज उपकेंद्र जळून खाक

मुंबई – मुंबईतील वडाळा पूर्व येथील संगमनगर भागात असलेल्या बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) च्या वीज उपकेंद्रात काल सोमवारी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी हानी झाली नाही.मात्र बेस्ट सब स्टेशनची संपूर्ण केबिन आगीत खाक झाली. अग्नीशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी पोहचून काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणली.

वडाळा (पूर्व) येथील संगम नगर परिसरातील विद्यालंकार कॉलेजच्या मागे असलेल्या वीज उपकेंद्रात रात्री ९.३० च्या सुमारास ही आग लागली.आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाच्या किमान चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या.पण या गाड्यांना घटनास्थळी पोहोचण्यास उशीर झाल्याचे सांगितले जात आहे.तोपर्यंत वीज उपकेंद्राची केबिन जळून खाक झाली होती.ही आग लेवल नंबर एकची असल्याचे अग्नीशमन अधिकार्‍यांनी सांगितले. या आगीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरातील दीनबंधू नगर,गणेशनगर, संगमनगर,शांतीनगर आणि आझादनगर मोहल्ला अंधारात बुडाला होता.

Scroll to Top