नाशिक- वणी-बोरगाव- सापुतारा महामार्गावर शनिवारी पहाटे तीन वाजण्याच्या दरम्यान नैताळे येथून शेतमजूर पिकअपने गुजरातकडे जात होते. सुरगाणा येथील वळणावर वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप वडाच्या झाडावर आदळली. या अपघातात मायेलकींसह एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य दहा ते बारा प्रवासी जखमी झाले आहेत.
गुजरातच्या अहवा येथील काही मजूर कामानिमित्त नांदूरमध्यमेश्वर येथे आले होते. काही दिवस थांबल्यानंतर घरी पिकअप वाहनाने परत निघाले होते. निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथून इतर मजुरांना घेऊन रात्री १२ वाजता घरी जाण्यासाठी निघाले होते. पहाटे तीन वाजता वणी-सापुतारा मार्गावरील हिरडपाडा येथे आली असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने वडाच्या झाडावर आदळली. यात दोन महिला आणि एका बालिकेचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये अर्चना विशाल म्हसे, मीना सोमा गुंबाड, रिहान विशाल म्हसे यांचा समावेश आहे. पोलिसांनी आणि स्थानिकांनी जखमींना बोरगाव आरोग्य केंद्रात दखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर जखमींच्या मागणीनुसार सर्व जखमींना गुजरातमधील शामगव्हाण केंद्रात पाठवले. त्यातील गंभीर नऊ जखमींना अहवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
वणी सापुतारा मार्गावर पिकअप वाहनाला अपघात
