पुणे – पुण्यातील वाघोली मध्ये “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पीएमआरडीए वाघोली व पुणे महानगरपालिकेच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
पुणे शहरातील वाघोली येथे शुक्रवारी रात्री ११:४५ च्या सुमारास उबाळे नगर या ठिकाणी ही आगीची घटना घडली. या आगीत ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीचा भडका उडाला. यात तीन कामगार होरपळल्याने त्यांचा मृत्यू झाला. यानंतर अग्निशमन दलाच्या ५ तर पीएमआरडीएच्या ४ अश्या एकूण ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. अखेर अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आग लागलेल्या गोडाऊनजवळच सुमारे ४०० सिलेंडरने भरलेले गोडाऊन होते. परंतु योग्य वेळी आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली.