चाकण – वाडा येथील पिंगटवाडी येथे दत्ता धर्माजी पिंगट यांच्या रहात्या घरी सांयकाळी गॅसचे शेगडीने अचानक पेट घेतल्याने गॅसचा स्फोट झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. जीवनावश्यक वस्तूची मात्र होळी झाली आहे.
वाडा (ता. खेड) येथे दत्ता पिंगट यांच्या घरी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास ही घटना घडली. दता पिंगट यांनी जाळ विझविण्याचा प्रयत्न केला परंतु जाळ आटोक्यात न आल्याचे पाहून त्यांनी घरातील माणसांना सुरक्षित बाहेर काढले तो पर्यंत गॅसचा स्फोट होऊन घराला मोठ्या प्रमाणात आगीने वेढले होते व घर कौलारू असल्याने आगीने तात्काळ आगीने पेट घेतला. या घराशेजारी राहणारे जीनसु नाना पिंगट यांच्या घरालाही या आगीने वेढले. स्थानिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली. नंतर अग्निशमन दलाची गाडीही आली पण तोपर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले होते.
वाडा येथील पिंगटवाडीला सिलेंडरचा स्फोट
