मुंबई – वादग्रस्त आयआरएस अधिकारी समीर वानखेडे धारावी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून लढविणार असल्याची जोरदार चर्चा आहे. धारावी मतदारसंघ हा अनुसूचित जातींसाठी आरक्षित आहे. समीर वानखेडे सध्या चेन्नई येथे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मध्ये कार्यरत आहेत. त्यांना निवडणूक लढवायची असल्यास पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी म्हटले की, “पक्ष प्रवेशासंदर्भात लवकरच निर्णय घेण्यात येईल. याबाबत अधिक़ृत भूमिका लवकरच स्पष्ट करू.” २०१९ च्या निवडणुकीत धारावी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड विजयी झाल्या होत्या . मात्र, लोकसभा निवडणुकीतही त्या विजयी झाल्याने त्यांनी विधानसभेचा राजीनामा दिला. या मतदारसंघातून आता त्यांची बहीण ज्योती गायकवाड यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे धारावीत ज्योती गायकवाड आणि समीर वानखेडे यांच्यात लढत होण्याची शक्यता आहे.
