वादळात उभा कंटेनर उलटल्याने दोन शेतमजुरांचा जागीच मृत्यू

जळगाव – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून अवकाळी पावसाचा वादळी वाऱ्याचा तडाखा सुरू आहे. अशातच काल सायंकाळी झालेल्या वादळी पावसातील वाऱ्याच्या तडाख्यात उभा कंटेनर उलटल्याने आडोशाला उभे असलेल्या दोन जणांचा कंटेनरखाली दबून मृत्यू झाला. या अपघातात आणखी एक व्यक्ती जखमी झाला आहे.

जळगाव तालुक्यातील चिंचोली – धानवड गावाजवळ काल दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या दुर्घटनेतील मृतांची नावे- भोला श्रीकुसूम पटेल आणि चंद्रकांत वाभळे अशी तर जखमीचे नाव अफरोज आलम असे आहे. जखमीवर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चिंचोली गावाजवळ नवीन शासकीय हॉस्पिटलच्या इमारतीचे बांधकामाचे काम सुरू आहे.याठिकाणी बिहार राज्यातील काही मजूर हे दोन महिन्यांपासून काम करत आहे.काल दुपारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाला सुरवात झाली. यावेळी वादळी वारा आणि पावसापासून जीव वाचविण्यासाठी येथील मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गेले. परंतु वादळी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने पत्र्याचे शेड उडाले.त्यानंतर ते पटांगणात उभ्या असलेल्या कंटेनरच्या बाजूला जाऊन उभे राहिले. मात्र वारा एवढा सुसाट होता की उभा कंटेनर उलटला. या कंटेरनखाली भोला श्रीकुसूम पटेल, चंद्रकांत वाभळे हे दोघे दबले गेल्याने जागीच ठार झाले तर सोबत असलेला अफरोज आलम हा जखमी झाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top