कोल्हापूर
तात्यासाहेब कोरेनगर येथील वारणा सहकारी दूध उत्पादक संघाच्यावतीने गणेश चतुर्थीनिमित्त सभासदांना प्रतिवर्षीप्रमाणे तूप देण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली. १६ ते ३० या कालावधीत संबंधित प्राथमिक दूध संस्था, संघाची वितरण केंद्रे व वितरक यांच्या मार्फत संघाच्या सभासदांना तूपाचे वाटप होणार आहे. सभासदांना संघामार्फत दरवर्षी महाशिवरात्री गणेशचतुर्थी व दीपावलीला सवलतीत तूप भेट दिले जाते.
ज्या सभासदाना तूप घेता आले नाही. त्यांना दि. २८ ते ३० सप्टेंबर या तारखेस कोल्हापूर विक्री केंद्रातून तूप देणेची व्यवस्था करण्यात येणार आहे. ओळखपत्र अथवा अन्य कागदपत्राची झेराक्स दाखवून सवलतीच्या दरातील तूप सभासदांनी घेवून जावे, असे आवाहन कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी केले.