वाराणसी विमानतळाच्या विकास कामाला मंजुरी

वाराणसी :

केंद्रीय मंत्रिमंडळाने वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासासाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाने मांडलेल्या प्रस्तावाला आज मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या प्रस्तावात विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीची उभारणी, अॅप्रनचा विस्तार, धावपट्टीचा विस्तार, टॅक्सीसाठी समांतर मार्गिका आणि इतर संलग्न कामांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत या विमानतळाची प्रवासी हाताळणी क्षमता वार्षिक ३.९ दशलक्ष प्रवासी इतकी आहे. या विकास कामानंतर विमानतळाच्या प्रवासी हाताळणी क्षमतेत वाढ होऊन ती प्रतिवर्ष ९.९ दशलक्ष प्रवासी इतकी होणार आहे. या प्रस्तावित कामांसाठी अंदाजे २८६९.५६ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मंजुरी मिळालेल्या प्रस्तावानुसार विमानतळासाठी ७५,००० चौरस मीटर क्षेत्रफळ क्षेत्राची नवी टर्मिनल इमारत उभारली जाणार आहे. या प्रस्तावात विमानतळाची धावपट्टी ४०७५ मीटर बाय ४५ मीटर विस्तारावी तसेच २० विमाने पार्क करण्यासाठी नवीन एप्रनही उभारावे असेही प्रस्तावित केले गेले आहे. वाराणसी विमानतळ हे हरित विमानतळ म्हणून विकसित केले जाणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top