विक्रम-वेताळ खेळ थांबवा! \’आप\’चे चंद्रकांत पाटलांना पत्र

पुणे :- कोथरुडचे वैभव आणि पुणे शहराचे फुफ्फुस समजले जाणारी तीन किलोमीटरची आणि लाखो झाडे असलेली वेताळ टेकडी फोडून दोन किलोमीटरचा रस्ता (बालभारती ते पौड) करण्याचा पुणे महापालिकेचा विचार आहे. पर्यावरणप्रेमींनी त्याला कडा़डून विरोध केला. पर्यावरणाची ही हानी रोखण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांना आम आदमी पार्टी तथा \’आप\’चे पुणे संयोजक आणि कोथरुडकर डॉ. अभिजीत मोरे यांनी विनंती पत्र लिहिले. दादा, पुण्यातील विक्रम –वेताळ खेळ थांबवा अशा मथळ्याखाली लिहिलेल्या पत्राला काय आणि कसा प्रतिसाद मिळतो, याकडे आता पर्यावरणप्रेमीच नाही, तर पुण्याचेही लक्ष लागले आहे.

डॉ. अभिजीत मोरे यांनी पत्रात लिहिलेले, विकासकामांना विरोध नाही, पण टेकड्या नष्ट केल्या,तर पुन्हा त्या कशा तयार करणार अशी नेमकी विचारणा याद्यारे करण्यात आली आहे. तसेच टेकडी फोडून रस्ता करण्याऐवजी शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याची सूचनाही यातून केली गेली आहे. वाढते प्रदूषण आणि हवेचा ढासळणारा दर्जा पाहता अशा टेकड्यांची सार्वजनिक आरोग्यासाठी नितांत गरज या पत्रातून प्रतिपादित करण्यात आली आहे.

\”वेताळ टेकडी फोडणे हा विकास नाही, तर विनाश आहे\” एवढे तुमच्या सरकारला व आयुक्त विक्रम कुमार यांना तुम्ही आमचे लोकप्रतिनिधी म्हणून सांगावे अशी विनंती आहे. चंद्रकांत पाटील (दादा) पुण्यात चाललेला विक्रम- वेताळ हा खेळ तात्काळ थांबवावा. अन्यथा हे वेताळ टेकडी नावाचे भूत भारतीय जनता पक्षाच्या डोक्यावर कधी बसेल हे कळणार देखील नाही.\” असे डॉ. अभिजीत मोरे आपल्या पत्राद्यारे म्हणाले.

Scroll to Top