विजयाचा आनंद नाही! जितेंद्र आव्हाडांची खंत

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड विधानसभा निवडणुकीत मुंब्रा-कळवा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आले. मात्र त्यांच्या पक्षाची आणि महाविकास आघाडीची कामगिरी अत्यंत वाईट झाली. त्यामुळे आव्हाडांनी आपल्या विजयाचा आनंद व्यक्त करण्याऐवजी मविआच्या वाईट कामगिरीबद्दल खंत व्यक्त केली.
या निकालाने मी खूप दुःखी झालो आहे. निकालावर संशयही आहे. आमचे सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील, असे होऊ शकत नाही. मी पहिल्या दिवशीपासून सांगत आलो आलो आहे, आजही सांगतो आणि पुढेही सांगेन की ईव्हीएमवर विश्वास ठेवू नका,असे आव्हाड म्हणाले.