विधान परिषदेच्या चार जागांसाठी उद्या निवडणूक

मुंबई – लोकसभेनंतर महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी उद्या निवडणूक पार पडणार आहे. या चार जागांमध्ये दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघाचा समावेश आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या चारही जागांची मुदत ७ जुलै रोजी संपणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जबरदस्त चुरस आहे. या निवडणुकीत काही ठिकाणी ४, तर काही ठिकाणी ५ उमेदवारांत निवड होणार आहे. या निवडणुकीची मतमोजणी १ जुलैला होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top