नवी दिल्ली – पॅरीस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्याने खरे तर विनेश फोगट हिने देशाची माफी मागितली पाहिजे.कारण ५० किलो वजनी गटात ती बसली नाही ही तिची चूक आहे. या चुकीची कबुली तिने दिली पाहिजे, असे मत लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळविलेला कुस्तीपटू योगेश्वर दत्त याने एका मुलाखतीत मांडले.एखादा खेळाडू ऑलिम्पिकसारख्या अत्यंत प्रतिष्ठित स्पर्धेत वैयक्तिक चुकांमुळे अपात्र ठरतो तेव्हा त्याने देशाची माफी मागितली पाहिजे. मात्र विनेश फोगट प्रकरणाला असे स्वरूप देण्यात आले की पंतप्रधान नरेंद्र मोदीच दोषी आहेत,असे योगेश्वर दत्त पुढे म्हणाला.