नवी दिल्ली – विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंग ही साबण आणि घरगुती साफसफाईच्या उत्पादनांसह दैनंदिन वापराच्या वस्तू बनविणारी कंपनी असून या कंपनीने आता पारंपारिक शाकाहारी मसाल्यांचे मिश्रण आणि केरळमधील ‘रेडी-टू-कूक’ ब्रँड ब्राह्मण या कंपनीशी खरेदी करार केला आहे. काल गुरूवारी या ब्रँडच्या अधिग्रहणाची घोषणा करण्यात आली. मात्र,कंपनीने कराराची रक्कम जाहीर केलेली नाही.
प्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजी यांच्या नेतृत्वाखालील विप्रो एंटरप्रायझेसने सहा महिन्यांपूर्वी मसाले आणि स्वयंपाकासाठी तयार उत्पादनांच्या निरापारा ब्रँडचे अधिग्रहण करून खाद्यपदार्थांच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे.आता या दोन कंपन्यांच्या अधिग्रहणांमुळे, विप्रो ग्राहक आपली मसाले, स्नॅक्स आणि ‘रेडी-टू-कूक’ श्रेणी मजबूत करत आहे, असे या कंपनीच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.विप्रो कंझ्युमर केअर अँड लाइटिंगचे एमडी आणि विप्रो एंटरप्रायझेसचे सीईओ विनित अग्रवाल हे म्हणाले, “आम्ही नीरापाराच्या पहिल्या संपादनासह फूड स्पेसमध्ये प्रवेश केला आहे. अवघ्या सहा महिन्यातच आता केरळचा ‘ ब्राम्हीण ‘ हा ब्रँड विकत घेतला आहे
हा ब्रँड दक्षिण भारतातील केरळमधील मसाल्याचा आणि स्वयंपाकासाठी तयार करण्यात आलेल्या पावडर ची करणारा ब्रँड आहे.३२ वर्षीय विष्णु नंबूदरी यांचा हा ब्रँड आहे.त्यांची सांभार पावडर केरळमध्ये विशेष प्रसिद्ध आहे.त्यांची सर्व उत्पादने शाकाहारी असल्यामुळे त्यांनी आपल्या कंपनीला ‘ब्राम्हीण ‘ असे नाव दिले आहे.