वसई –
विरार पश्चिमेमधील डोंगरपाडा ते डीमार्टपर्यंतच्या रस्त्यावर असलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या शो रुमला भीषण आग लागली. ही घटना आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली. या आगीत ३५ ईलेक्ट्रिक बाईक, २ संगणक, १ लॅपटॉप जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
डोंगरपाडा ते डीमार्ट रस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये ‘माय राईड जॉय ई बाईक` हे ईलेक्ट्रिक बाईक विक्रीचे शो रूम आहे. या शो रूमला सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी या शो रूमचे शटर बंद असल्याने कटरच्या साहाय्याने तोडून आगीवर नियंत्रण मिळविले. ही आग शॉर्टसर्किट झाल्याने लागली असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. संगणक खोलीत काही रोख रक्कम होती. ती अग्निशमन दलाच्या जवानांनी बाहेर काढून दुकानमालकाकडे सुपूर्द केली.
विरारमधील ईलेक्ट्रिक बाईकच्या शो रूमला आग
