विरोधक भोपळे घेऊन विधिमंडळ पायरीवर

मुंबई- बजेटमध्ये मिळाला भोपळा, महाराष्ट्राला मिळाला भोपळा, बजेट म्हणजे भ्रमाचा भोपळा, बजेट म्हणजे रिकामा खोका, सर्वसामान्यांना मिळाला भोपळा, सत्तेत कामी आले खोके, सर्वसामान्यांना मात्र धोके अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत शिंदे सरकारच्या अर्थसंकल्पाचा निषेध केला.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आज आठवा दिवस होता…महाविकास आघाडीच्या आमदारांनी विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली अर्थसंकल्पावर जोरदार निदर्शने केली. महाविकास आघाडीचे आमदार भोपळा डोक्यावर घेऊनच शिंदे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर पायर्‍यांवर आंदोलन करण्यात आले.

Scroll to Top