मुंबई : गणेश विसर्जन स्थळावर कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना विमा कवच द्या, अशी मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष वकील नरेश दहिबावकर यांनी पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबईमधील मोठमोठ्या मंडळांनी विमा काढलेला आहे. परंतु गिरगांव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी या विसर्जनाच्या ठिकाणीही भाविकांची प्रचंड गर्दी असते. भाविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने वेगवेगळ्या यंत्रणा काळजी घेत असतात. परंतु एखादी नैसर्गिक आपत्ती उद्भवली किंवा काही घातपात झाल्यास त्यावेळी तिथे कार्यरत असणाऱ्या अधिकारी आणि कमर्चारी यांना विमा कवच देण्यात यावे अशी, मागणी समितीने केली आहे.
विसर्जन स्थळावर कार्यरत कर्मचाऱ्यांना विमा कवच द्या
