सिंधुदुर्ग
वेंगुर्ले आगारातून मुंबई- परेल, पुणे, तुळजापूर, बेळगांव अशा नवीन लांबपल्ल्याच्या एस.टी बस उन्हाळी हंगामासाठी १५ जनूपर्यंत सुरू करण्यात आल्या आहेत. या बसगाड्यांचा लाभ प्रवासी वर्गाने घ्यावा असे आवाहन वेंगुर्ले आगार व्यवस्थापक राहुल कुंभार व बसस्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले.
वेंगुर्ले आजरामार्गे बेळगांव बस सकाळी ५.१५ वाजता निघेल तर ती बेळगांव- वेंगुर्ले अशी बेळगांवातून सकाळी १० वाजता वेंगुर्लेसाठी निघेल. वेंगुर्ले-पुणे रातराणी बस सायंकाळी ४ वाजता आजरामार्गे निघणार असून ती पुणे आजरामार्गे वेंगुर्लेस परतीसाठी पुणे येथून सायंकाळी ७ वाजता निघेल. आरोंदा-परेल बस वेंगुर्ले आगारातून सायंकाळी ४ वाजता निघणार आहेत तर परेल-आरोंदा बस परेल येथून सायंकाळी ४ वाजता सुटणार आहे. वेंगुर्ले आचरामार्गे तुळजापूर ही बस वेंगुर्ले आगारातून पहाटे ५ वाजता सुटणार आहेत तर तुळजापूर आजरामार्गे वेंगुर्ले बस तुळजापूर येथून पहाटे ५ वाजता सुटणार आहे. वेंगुर्ले बाडामार्गे कोल्हापूर ही बस वेंगुर्ले आगारातून दुपारी २.३० वाजता सुटणार आहे. ही बस कोल्हापूर-फोडामार्गे वेंगुर्ले अशी कोल्हापूरहून सकाळी ६ वाजता सुटणार आहे. वेंगुर्ले दाभोली बावडामार्गे पुणे बस गुर्त आगारातून सकाळी ९ वाजता सुटणार असून ही बस पुणे-फोंडाघाट- मठमार्गे अशी पुणे येथून सकाळी ९ वाजता सुटणार आहे.