मुंबई :- मुंबईच्या बीकेसी येथील एक बाईक स्टंटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एक तरुण दोन युवतींसह दुचाकीवर धोकादायक स्टंट करताना दिसला. या तिघांविरुद्ध मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. या व्हिडिओमध्ये एक तरुणी पेट्रोलच्या टाकीवर बसली आहे, तर दुसरी तरुणी पाठीमागे बसलेली दिसली. या दोन तरुणींच्या मध्ये दुचाकीवर बसवून एक तरुण वेगाने दुचाकी चालवताना दिसला.
हा व्हिडिओ रात्रीच्या वेळचा असून आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा चित्तथरारक व्हिडिओ पॅथहोल वॉरियर्स फाउंडेशन या अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. दोन तरुणींसह हेल्मेट न घालता एक तरुण धोकादायक स्टंट करताना दिसला. त्यांना माहिती आहे की मुंबईतील रस्ते आता पॅथहोल फ्री झालेले आहेत. कृपया यांना पकडा, असे कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आले. यानंतर पोलिसांनी व्हिडिओतील तिघांविरुद्ध कलम 144 अंतर्गत गुन्हा दाखल केला.