वैभववाडीजवळ अपघात २० प्रवासी गंभीर जखमी

सिंधुदुर्ग :

जिल्ह्याच्या वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा रिंगेवाडी येथे एसटी बस आयशर टेम्पोला धडकली. आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.
विजयदुर्ग ते पुणे असा प्रवास करणारी एसटी बस भुईबावडा रिंगेवाडी येथे आली असता गगनबावड्याहून भुईबावडा मार्गे येणाऱ्या आयशर टेम्पोला धडकली. या अपघातात एसटी बसमधील सुमारे २० प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून ४ प्रवासी गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी वैभववाडी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top