मुंबई – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज बेळगावहून मुंबईला परतताच शरद पवारांनी शिवसेनेवर केलेले आरोप तीव्र शब्दात खोडून काढले आणि म्हटले की, शरद पवारांचे पुस्तक सर्वजण दोन दिवस वाचतील आणि मग ते पुस्तक ग्रंथालयात जाईल.
शरद पवारांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात म्हटले आहे की, मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचा कोणत्याही नेत्याचा विचार नाही. त्यामुळे हा विषय बंद करावा. यावर संजय राऊत यांनी विरोध करीत म्हटले की, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचे कारस्थान नक्कीच सुरू आहे. उध्दव ठाकरे हे दोनदाच मंत्रालयात येत असत, या पवारांच्या आरोपाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, हे खरे नाही, उध्दव ठाकरे अनेकवेळा मंत्रालयात जात होते. कोरोना काळात मात्र काही काळ जात नव्हते. कारण तेव्हा केंद्राचाच वर्क फ्रॉम होमचा आदेश होता. शिवसेनेत अस्वस्थता होती. या शरद पवारांच्या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत राऊत म्हणाले की, सध्या राष्ट्रवादीत
अस्वस्थता आहे.
शरद पवारांचे पुस्तक ग्रंथालयात जाईल
