सोलापूर – सोलापूर येथील आंबा महोत्सवात ठेवण्यात आलेल्या आंब्याला ’शरद मँगो’ असे नाव देण्यात आले आहे. सोलापूरच्या माढा तालुक्यातील अरण येथील शेतकरी दत्तात्रय गाडगे यांनी बागेतील आंब्याच्या झाडांवर विविध प्रयोग करत या अडीच किलोच्या आंब्याचे उत्पादन घेतले आहे. आंबा महोत्सवात ’शरद मँगो’ हे नाव पाहून ग्राहक याकडे अधिक आकर्षित होत आहेत. मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी आणलेल्या फळबाग योजनेतून आम्ही 8 एकर शेतजमिनीत जवळपास 7 हजार केशर आंब्याची रोपे लावली आहेत. यामुळेच या अडीच किलोच्या आंब्याला शरद पवार यांचे म्हणजेच शरद मँगो असे नाव दिल्याचे गाडगे यांनी सांगितले.
शरद पवारांच्या नावाचा आंबा!
