पुणे- भाजपचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत शरद मोहोळची पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशानंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या असताना भाजपच्या वाटेवर असलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली.
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, ‘हा ज्या त्या पक्षाचा अधिकार आहे.जनतेने राज्यकर्ते कुठल्या स्तराला चाललेत हे लक्षात घ्यायला पाहिजे. माझ्याकडून मागे एक चूक झाली होती, ती मी सुधारली.चंद्रकांत पाटील उच्च शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी काही विचार केला असावा.`
शरद मोहोळवर हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे अनेक गुन्हे नोंद आहे. जुलै 2022मध्ये शरद मोहोळला पुणे जिल्ह्यातून तडीपारदेखील करण्यात आले होते.काही दिवसांपूर्वी अहमदनगरमध्ये शरद मोहोळ पोलीस ठाण्यात गेले होते, त्यावेळी मुख्यमंत्रीदेखील होते. त्या दोघांचा फोटोदेखील व्हायरल झाला होता. त्यानंतर त्याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल झाला होता. हत्येच्या प्रकरणात येरवडा कारागृहातून जामीनावर आहे आणि तडीपारही आहे. अशाच्या पत्नीला भाजपाकडून चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश देण्यात आला आहे.
शरद मोहोळच्या पत्नीचा भाजपात प्रवेश
