शहीद जवानाचा मुलगा वर्षानंतरही पित्याला पाठवितो व्हॉईस मेसेज

अनंतनाग – वडील आणि मुलाच्या भावनिक नात्याचे मन हेलावून टाकणारे उदाहरण नुकतेच समोर आले. दहशतवाद्यांशी सामना करताना शहीद झालेल्या एका लष्करी अधिकाऱ्याचा सात वर्षांचा मुलगा आजही आपल्या पित्याच्या मोबाईलवर व्हॉईस मेसेज पाठवून त्यांना एकदा तरी घरी येऊन जा,अशी आर्जवे करतो. आपले वडील कधीच परत येणार नाहीत हे तो मानायलाच तयार नाही.
गेल्या वर्षी १३ सप्टेंबर रोजी जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्हयात गदूल गावालगतच्या जंगलात लष्करी जवान आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झडली. यात कर्नल सिंग, मेजर आशिष धोनचाक, जम्मू काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायून भट आणि शिपाई प्रदीप सिंग यांना वीरमरण आले.
कर्नल सिंग यांचा मुलगा कबीर तेव्हा अवघ्या सहा वर्षांचा होता.आपल्या पित्याचे काय झाले हेच तो समजू शकला नाही. तेव्हापासून तो वारंवार आपल्या पित्याच्या मोबाईलवर व्हॉईस मेसेज पाठवतो. ‘पापा, बस एक बार आ जाओ, फीर मिशन पर चले जाना ‘, असे आर्जव तो आपल्या वडिलांना करतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top