Home / News / शासकीय कामकाजात आता फक्त ‘संदेस’चाच वापर

शासकीय कामकाजात आता फक्त ‘संदेस’चाच वापर

मुंबई- शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अ‍ॅप वापरता येणार नाही. सरकारी कर्मचार्‍यांना सरकारी कामासाठी...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- शासकीय कामकाजात सरकारी कर्मचाऱ्यांना यापुढे व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ही दोन संपर्कासाठीची अ‍ॅप वापरता येणार नाही. सरकारी कर्मचार्‍यांना सरकारी कामासाठी फक्त ‘संदेस इन्स्टंट मैसेजिंग’ अ‍ॅपच वापरावे लागणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने नुकताच यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. केंद्र शासन आणि राज्य शासन शासकीय कार्यालये स्थानिक संस्थांमध्ये हजारो संदेशांची देवाणघेवाण होते. हे संदेश प्रामुख्याने मजकूर स्वरूपात असले तरी, ऑडिओ व्हिडिओ क्लिप आणि नस्ती (फाईल) इत्यादींमधील माहितीचीदेखील देवाणघेवाण होते. डिजिटल इंडिया कार्यक्रम अंतर्गत आत्मनिर्भर भारताचा एक उपक्रम म्हणून ‘संदेस’ अ‍ॅप उपयुक्त आहे. संदेस ही शासकीय पायाभूत सुविधांवर आधारित सुरक्षित प्रणाली आहे. तिचे धोरणात्मक नियंत्रण शासनाकडे आहे. संदेस अ‍ॅप हे गुगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर कोणालाही डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.

Web Title:
संबंधित बातम्या