सावंतवाडी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक डी एड बेरोजगार उमेदवारांचा प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित असून त्यासाठी त्यांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. पण त्याकडेही प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पण अत्यंत दुर्दैवाची बाब म्हणजे राज्याचे शिक्षणमंत्री आपले घरचे असूनही या डीएड उमेदवारांचे प्रश्न सुटत नाहीत,हे उमेदवार वार्यावर सोडले गेले आहेत,अशी खंत ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी नगरसेवक अण्णा ऊर्फ वसंत केसरकर यांनी व्यक्त केली आहे.
वसंत केसरकर पुढे असेही म्हणाले की, मागील दहा दिवसांपासून हे डीएड उमेदवार आपल्या नोकरीच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलनास बसले आहेत. त्यांच्याकडे कुणीही लक्ष देईना,पण आता या जिल्ह्याचे सुपुत्र असलेले राज्याचे गृहमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी या जिल्ह्याला वेगळा निकष लावावा लागला तरी ते करावे पण या डी एड उमेदवारांना न्याय मिळाला पाहिजे. कारण जर त्यांना आता न्याय मिळाला नाही तर त्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.त्यावेळी मात्र त्या परिस्थितीला स्वतः शिक्षणमंत्री केसरकर हेच जबाबदार राहतील अशा निर्वाणीच्या सुरात सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
शिक्षणमंत्री घरचे असून डीएड