नवी दिल्ली :- शिधा पत्रिकेद्वारे मोफत शिधा घेत असलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने शिधा पत्रिका आधारकार्डशी लिंक करण्याचे आदेश दिले होते. याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ होती. मात्र, आता याचा कालावधी वाढवून ३० जून करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना या कामासाठी अधिक वेळ मिळणार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने आधार आणि रेशनकार्ड लिंक करण्यासाठी तारीख वाढवण्याची अधिसूचना जारी केली. त्यानुसार आता केंद्र सरकारने याची अंतिम तारीख ३० जून २०२३ केली आहे. रेशनकार्डला सरकारने \’वन नेशन वन रेशन\’ या पार्श्ववभूमीवर रेशनकार्ड आधारकार्डाशी जोडण्यावर भर दिला आहे.