बँकॉक – थायलंडचे पंतप्रधान थाक्सिन शिनावात्रा यांना काही दिवसांपूर्वी कोर्टाच्या आदेशाने हटवण्यात आले. त्यानंतर थायलंडच्या संसदेने आज त्यांच्या कन्या पेटोंगटार्न शिनावात्रा यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. ३७ वर्षीय पेटोंगटार्न यांच्या समर्थनार्थ ३१९ आणि विरोधात १४५ मते पडली.थायलंडच्या आजवरच्या सर्वात तरुण पंतप्रधानही ठरल्या आहेत. तर त्यांची मावशी यिंगलक शिनावात्रा यांच्यानंतर पंतप्रधानपद भूषवणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत.पेटोंगटार्न शिनावात्रा यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. थायलंडची रखडलेली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे, लष्करी उठाव आणि न्यायालयाचा हस्तक्षेप टाळण्याची जबाबदारी पेटोंगटार्न शिनावाजा यांच्यावर आहे. या आव्हानामुळे त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखालील चार सरकारे कोसळली आहे. गेल्या दोन दशकात पंतप्रधान म्हणून नियुक्त झालेल्या पेटोंगटार्न शिनावात्रा या त्यांच्या कुटुंबातील चौथ्या सदस्या आहेत. त्यांचे वडील थाक्सिन आणि काकी यिंगलक यांच्यासह तीन सदस्यांना लष्कारी उठाव किंवा घटनात्मक न्यायालयाच्या निर्णयाद्वारे पदावरुन हटवण्यात आले होते.
